Saturday, July 27, 2013



‘ मन ’

कितीतरी लाटा उसळताना या किनाऱ्यावर उत्साहाच्या
परतीलाच पाठवतं हे मन, समजून त्यांना बेभरवशाच्या

सगळंच काही नेहमी मनासारखं होत नाही
विचार करावा लागतो कधीतरी, इतरांच्या मनाचाही

मनाचा झोका जातो उंच उंच आकाशात
कधी हरवल्यासारखे वाटते मन जगाच्या या नकाशात

आपलीच गती कधी कमी वाटते दुनियेच्या या शर्यतीत
पण शर्यत ही चालू ठेवावीच लागते, गात स्फूर्तीचे गीत

मनाच्या कोपऱ्यात येती विचार असे किती
आणि किती सहजतेने हिरावून नेती मनाची शांती


मनाची झेप काही मावत नाही भावनांच्या या गर्दीत
शेवटी झेप ही घ्यावीच लागते, हीच तर जगाची रीत


कोणा सांगून येत नाही मनाला या लहर
त्याच्या या खेळीनेच जीवाचा होतो कहर

कधी म्हणावं जरा, पुरे आता सांभाळ स्वतःला
कशाला घाबरायचे आता, विरोध का माझ्या मताला ?

जग जालीम वाटले तरी शेवटी ते आपलेच आहे
अगण्य मानवाच्या चुका तो ही हसत पाहे

तुझ्या कारणे घडती जगात अनेक अनर्थ

पण तुलाच आहे सावरायचे, तूच आहेस परमार्थ...!