आता मागे वळणे
नाही
गर्द काळोखात
निराशाच्या साम्राज्यात
काट्यांच्या
वाटेवर उतरलो मी त्या निराळ्या युद्धात
एकट्या वाटतील वाटा
नि दुरावतील आपले काही
तरी क्रांतीच्या
वाटेवर आता मागे वळणे नाही
सोडावे लागतील जरी
रत्नांचे ते हार
तेवढाच कमी होईल
डोईवरचा आसुरी भार
सोसावे जरी लागले
शब्द नि अस्त्रांचे प्रहार
लक्ष लक्ष
घावांतून न्हाऊन निघावा देह चिरकाल
सिंहासन अर्पिले
ज्यांना मी कोट्यावधी अपेक्षांनी
कोट्यावधींच्याचच
अपेक्षा होत्या त्यांच्या ठायी ठायी
असंतोष हा मनात
आपल्या, की मनात सर्वांच्याही
मनाच्या
क्रांतीच्या वाटेवर आता मागे वळणे नाही
झोंबते ती साठी,
आली घेऊन व्यवस्थेची दुर्दशा
योजनांचे भिनले जाळे,
मात्र सामन्यांच्या पदरी निराशा
झोपड्या वाढत जाती
अन् त्यांचे इमारतींवरून जुंपले
विकासाची पाहता
स्वप्ने, कोसळती लोकशाहीच्या पत्त्यांचे बंगले
आवाज न माझा कुणी
एके ना ओरडणे मला जमते
सुरु करता एक
लढाई, स्वातंत्र्य तेथे आपले संपते
सहनशक्तीचा अंत पाहून
झाली अंगाची लाही लाही
तरी क्रांतीच्या वाटेवर
आता मागे वळणे नाही
उठून राहावे उभे
पण सांगावे ते किती अन् कुणाला
कान सर्वदा
टवकारलेले दलालीसाठी सरसावायला
पडला पिडितांचा
विसर त्यांना, भरताना आपले खिसे
मतांची करताना
अपेक्षा , उपेक्षा सामन्यांची न दिसे
खरडले कितीही तरी
न मिळे उत्तर ना प्रतिसाद
आता बदलांचे वाहू
लागले वारे, केला स्फूर्तीचा शंखनाद
अडथळ्यांसोबतच
आशाही दिसली न्याहाळता दिशा दाही
म्हणूनच
क्रांतीच्या वाटेवर आता मागे वळणे नाही
क्रांतीच्या
वाटेवर आता मागे वळणे नाही...!
No comments:
Post a Comment