कोणी वेड लावले मला ?
विचारायचे आहे तुला
वेड तू लावलेस का मला ?
सांगितले नाहीस खरे तरी
नकळत कळेल मला
लावले कोणी वेड मला
ओढ लागली या जीवाला
सरता सरत नाही हा दिवस
तुझा ध्यास का मनी लागला
सांगितले नाहीस खरे तरी
नकळत कळेल मला
गम्मत तुझ्याबरोबर राहण्यात आहे
रोज तुझा चेहरा पाहण्यात आहे
आरशात न्याहाळतेस तेव्हा पाहतो मी
तुझं सौंदर्य ही देवाची कला
सांगितले नाहीस खरे तरी
नकळत कळेल मला
आधी नव्हते झाले असे कधी
स्वतःशीच बोलण्यात मी हरवलो
वाटले कोण घेऊन गेली काळीज माझे
ते ही पुरावा न ठेवता आपला ?
सांगितले नाहीस खरे तरी
नकळत कळेल मला
जादूची छडी आहे तुजपाशी
याची खबर आहे ना मला
भीती नव्हती मला तुझ्या रागाची
फक्त एकदा जादू करून दाखव मला
विचारायचे आहे तुला
वेड तू लावलेस का मला ?
सांगितले नाहीस खरे तरी
नकळत कळेल मला
No comments:
Post a Comment