Thursday, January 29, 2015

Book review
THE WORLD IS FLAT

मित्रांनो, मी ज्या पुस्तकाबद्दल लिहितोय, त्यात  राजा नाही, राणी नाही, युद्ध  नाही, fantasy अशी काही नाही. तरीही हे पुस्तक वाचताना अंगावर शहारे येतात. हे पुस्तक मी एक  novel म्हणून सुरु केले. पण वाचून वाचून होईपर्यंत ते माझ्यासाठी एक textbook झाले होते. आपण आपल्या शंकांचे निरसन  करण्यासाठी पाठ्यपुस्तकाचा आधार घेतो, तसेच मी आता माझ्या जगाविषयी आणि त्याच्या भविष्य विषयीच्या शंका दूर करण्यासाठी या पुस्तकाचा आधार  घ्यायला लागलो आहे.

The world is flat हे Thomas Friedman या अमेरिकन पत्रकाराने जागतिकीकरण या विषयावर लिहीलेलं  पुस्तक आहे. दीड हजार वर्षांपूर्वी पायथागोरस ने म्हटले की पृथ्वी गोल आहे. आणि आता इथे  की the world is flat? तो शास्त्रीय रित्या चूक आहे का? तर नाही. त्याला  इतकेच म्हणायचे आहे, की पूर्वीच्या मानाने आजच्या काळात जगातील अधिकाधिक जागांमधील जास्तीत जास्त लोकांना बहुतांशी ज्ञान आणि सुविधांचा वापर करणे शक्य झाले आहे. त्यामुळे जगाचे मैदान कोण्या एका बाजूला झुकलेले राहता आता  समतोल झाले आहे. म्हणजेच सर्वांना समान संधी उपलब्ध आहेत.

पुस्तकाची सुरुवात फ्रीडमन यांच्या भारत भेटीने होते. बंगळूर मधील इंफोसीस च्या कार्यालात नंदन निलेकणी यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्या लक्षात येते कि मागील १५ वर्षात विविध कारणांमुळे जगातील प्रत्येक कोपऱ्या पर्यंत जागतिकीकरणा ची लहर पोहोचली आहे. लेखक  म्हणतो,कि त्याच्या बालपणी त्याचे पालक त्याला म्हणायचे- Thomas, finish your dinner. people in India and China are striving. आज तो आपल्या मुलींना म्हणतोय- Girls, finish your homework. people in India and China are starving for your job.
बहुतांशी माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट, तसेच बर्लिन ची भिंत पडणे यासारख्या जागतिक महत्त्वाच्या घटना यांचा संदर्भ घेऊन लेखक जगाला एका पातळीवर आणणारे १० घटक सांगतो. याबरोबरच, हे घटक एकत्र येण्याचे  टप्पेही  लेखक विस्तृत पणे मांडतो .

असेच एकदा खम्बाती देशांमधील युद्धाची मीमांसा करताना जेव्हा लेखक लिहिण्यासाठी LAPTOP उघडतो  तेव्हा त्याचे लक्ष्य त्यावरील Dell च्या logo कडे जाते. कुतूहलाने तो तेथे संपर्क करून त्त्यांच्या supply chain म्हणजेच व्यापारातील साखळी बद्दल माहिती मिळवतो. त्याच्या असे लक्षात येते की या एका LAPTOP चे भाग चीन, तैवान, मलेशिया, सिंगापूर अशा आशियातील विविध देशांतून  येतात आणि मग एकत्र  जोडले जातात . आणि महत्त्वाचे  म्हणजे  या देशामध्ये अनेक मतभेद असून सुद्धा ते एक मेकांबरोबर सलोख्याने राहत आहेत. मग याचे कारण काय? तर जेव्हा दोन देश एका जागतिक व्यापारी साखळीचे भाग असतात, तेव्हा त्यांच्यासाठी युद्धाची किमत ही कितीतरी पटीने अधिक असतेहेच भारत आणि पाकिस्तान तसेच  चीन आणि कोरिया  यांनाही लागू पदते. पण इराक आणि इराण, अफगाणिस्तान, सायरिया यांना लागू पडत नहि. तेव्हा जागतिकीकरण हे एका अर्थाने शांततेसाठी पूरक आहे असे लेखकाचे म्हणणे आहे. या उदाहरणावरूनच जागतिक सलोख्यासाठी तो व्यापाराच्या जागतिकी करणाची conflict prevention theory मांडतो .

जागतिकीकरणाचे वारे एखाद्या छोट्याश्या गावात सुध्दा  कसे पोहोचू शकतात हे सांगताना तो आंध्र प्रदेश  मधील कुपम या छोट्याश्या गावाचे उदाहरण देतो. HP या जग विख्यात camera/ computers/ printers तयार करणाऱ्या कंपनीने या खेड्यातील लोकांना आपलि गावासाठी स्वप्ने  विचारली आणि ती एका चित्रकाराद्वारा   कागदावर उतरवून एका भिंतीवर लावली .   यात गाव कार्यांना चांगले रस्ते   इथपासून विमानतळ या सुविधा  गावात येण्या बद्द्ल आशा होति. यात एक गोष्ट त्यांना   प्रामुख्याने दिसली ती म्हणजे तेथे कोणतेही छायाचित्र काढण्याचे ठिकाण नव्हते. त्यासाठी  १० किलोमीटर दूर अशा ठिकाणी जावे  लागत असे. तेव्हा  कंपनीने तेथील   महिला बचत गटाला एक कॅमेरा   घेऊन दिला . गावात लोक ओळखपत्र इतर अनेक कार्यक्रमांसाठी या सुविधेचा वापर करू लगले. कंपनीला यातील थोडा नफा देण्याचे मान्य केले गेले. असे चालू  असतांना महिन्या नंतर  कंपनीने त्या गटाला आपले साहित्य  परत मगितले. आश्चर्य चकित महिलानी  याला नकार दिला . कंपनीने स्पष्ट केले कि ती कोणती समाजसेवी   संस्था नाही,. तेव्हा त्या गटाने  भाडे देऊन तो कॅमेरा  प्रिंटर ठेवण्याचे मान्य केले. यातून त्या गावल सुविधा मिळाली, महिलांना रोजगार मिळाला आणि कंपनीला हि कोणता तोटा नाही झल.   सामाजीक उद्योजकतेचे एक उदाहरण म्हणून लेखक हे तेथे मांडतो .


याबरोबरच लेखकाने मांडलेल्या अनेक संकल्पना मनात घर करून बसतात. एके ठिकाणी लेखक Michael hammer याचे वाक्य लिहितो-  One thing tells me a company is in trouble- when they tell me how good they were in past. It is also true with countries.
जेव्हा एखादी संस्था आपल्या भूतकालाबद्दल खूप काही चांगले सांगत असते ,तेव्हा समजावे कि त्यांचा अंत जवळ आला आहे. हे राष्ट्रांबद्दल सुद्धा तेवढेच खरे आहे. यावर उपाय म्हणून लेखक म्हणतो कि our dreams should outgrow our memories. आपली  स्वप्ने हि आपल्या आठवणी पेक्षा जास्त मोठी असावित . हीच गोष्ट पुढे नेताना लेखक David Rothkopf याचे एक वाक्य सांगतो-
The hallmark of a truly successful organization is the willingness to abandon what made it successful and start afresh.
एखादी संस्था  यशस्वी असण्याची कसोटी म्हणजे  जेव्हा ती त्या सर्व गोष्टींना पूर्णविराम द्यायला तयार असेल ज्यामुळे ती पूर्वी यशस्वी झाली होति.

जगाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन (किंवा 'नवा चष्मा') देणारे हे पुस्तक नक्की वाचण्या सारखे आहे .